100+ Quotes in marathi on life | मराठी जीवन स्टेटस

Quotes in marathi on life – प्रत्येक दिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो आणि तो अजून खास करूया. आपल्या प्रिय मित्रांना, नातेवाईकांना आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय.आम्ही घेऊन आलोय तुमच्या साठी खास नवीन Life quotes in Marathi , life quotes in marathi, quotes on life in marathi, quotes about life in marathi, marathi sms  शुभेच्छा संग्रह जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल. हे Marathi life quotes शेअर करा आपल्या प्रियजनासोबत.

.

.

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात
म्हणुन मनातल्या गोष्टी
जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा
कारण त्याने मन हलके तर होईलच
आणि लढण्याची ताकद पण येईल…!


समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.


माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते…


माणसं त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दुर जातात…


शब्दांविना जगणे म्हणजे
श्वासाशिवायच जगण झाल
चमकणार्या नक्षत्रांनाही
शब्दांनीच तर जीवन दिल.


शहाण्या माणसाच्या आयुष्याचा उत्तरार्ध
त्याने पूर्वार्धात गोळा गोळा केलेले
पूर्वग्रह,
चुकीच्या समजुती आणि चुकांना दुरुस्त करण्यात
व्यग्र असतो.


Read More: 1000 + Happy birthday wishes with images.

Read More: 1000 + Good morning quotes with images.

Read More: 500 + Good night status with images.


नेहमी तत्पर रहा….. बेसावध आयुष्य जगू नका.


संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव !


माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात
मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.


संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.


संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात. तालाची एक मात्रा चुकली तरी त्या नाराज होतात, सूर बेसूर होतात. म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फ़ार जपावं लागतं-स्वत:लाही आणि इतरांनाही !


सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे…


शब्द , पूर आणि डोळे
सगळे शेवटी निमित्तच रे
मरण्याआधी आनंदासाठी
कसे जगायचे?
याचेच निष्फळ प्रयत्न रे.


या जगात एकच जात आहे- माणूस ! आणि धर्मही एकच- माणूसकी!


अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते.


मी दुनियेबरोबर “लढु” शकतो
पण “आपल्या माणसांबरोबर” नाही,
कारण “आपल्या माणसांबरोबर”
मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे… !!


विश्वास म्हणजे मनुष्याला जीवंत ठेवणारी शक्ती होय…


विश्वास जपनं खुप महत्त्वाच असत…कारण एकदा दिलेला शब्द खाली पडला की , sorry या शब्दाला काहीच अर्थ राहत नाही…


शत्रुशी मित्रत्व राखणे ही प्रेमाची खरी कसोटी आहे.


विज्ञानाखेरीज अपल्याला भविष्य नाही पण त्याला आध्यात्माचा लगाम हवा.


विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते.


लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.


भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.


रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन .


वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतो.कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही. कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी पण परत येत नाही. असेच वेळेचे पण आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही.म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा……………


विचार कुठुनही घ्यावेत पण घेताना ते पारखून घ्यावेत.


आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा
जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग अपोआप सुंदर बनत.


आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो
की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते.


संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा दु:ख वाटून घेण्यात फ़ार मोठा आनंद असतो.


वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं.


आळसात आरंभी सुख वाटते,
पण त्याचा शेवट दु:खात होतो.


वयानं मोठ्या झालेल्या माणसाचं सर्वात मोठं दु:ख हेच आहे की त्याला लहानासारखं मोकळेपणानं मनसोक्त रडता येत नाही !


वृद्धाश्रमात आई वडिलांना सोडून तो पलटतच होता
की…
.
वडिलांनी आवाज देउन सांगितलं,
बाळा, आपल्या मनात कोणत्या ही प्रकारचे ओझे ठेऊ
नकोस…😒
.
तुला मिळवण्यासाठी दोन
मुलींची हत्या केली
होती…😣
शिक्षा तर मिळणारच होती…😔
One Of The Best Message ever .


लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.


फुलपाखरु फक्त 14 दिवस जगतं,
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगुन कित्येक हदय जिकंत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि
प्रत्येक हदय जिकंत रहा.


मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.


मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा. गमावलेल्या सुखासाठी हळहळण्यात मन गुंतवणं व्यर्थ होय.


श्रीमंती पैसे कमावण्यात नाही तर पैसे कमावतांना आपल्यातला माणूस घडवण्यात आहे…


माणसाच्या आयुष्याचे रहस्य केवळ जगण्यात नसून कशासाठीतरी जगण्यात आहे…


माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.


बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका…


वडिलांचे प्रेम रांगोळी आणून देण
आईचे प्रेम रांगोळी काढायला शिकविणे
मुलाचे प्रेम सुंदर पांढरी रांगोळी काढणे
मुलीचे / प्रेयसीचे प्रेम त्या सुंदर रांगोळी मध्ये वेगवेगळे रंग भरणे ♥ ♥ ♥
आता ह्या कवितेमध्ये रांगोळी ह्या शब्दाच्या जागी आयुष्य हा शब्द वापरून पुन्हा वाचा.


संपूर्ण जग सुंदर आहे , फक्त तसं पाहायला हवं.


मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत… वित भर सुखासाठी हातभर दु:खांशी compromise करणं…


जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा
आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.


मानवाच्या शरीरातच त्याच्या कल्याणाचा खजिना भरलेला आहे आणि तो शोधण्याचे सामर्थ्य देखील परमेश्वराने मानवाला दिलेले आहे…


यशस्वी होणं हा निव्वळ नशिबाचा खेळ आहे… विश्वास बसत नसेल तर एखाद्या नापास पोराला विचारा…


मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होउन जगावं लागतं … सुख मिळवन्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं .


मला ‪‎हरण्याची‬ कधीच भीती नाही. कारण मी जे काही निर्माण करण्याचा ‪प्रयत्न‬ करतोय ते शून्यातून करतोय. आपण एक दिवस ‪चमकणारच‬ हे निश्चित आहे.


मेल्यानंतर काय होतं, हे मेल्याशिवय कळत नाही, पण जगून काय केल याच उत्तर बरेचदा मेल्या नंतरही मिळत नाही..


भक्ती हे सोंग नाही, मन सुधारण्याचा तो एक मार्ग आहे…


मनातले सारे काही सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस असावा लागतो . . एवढं असूनही चालत नाही त्या माणसालाही मन असावं लागतं….


माहीती नाहि का पण,
जिवनाचा तेढा सुटत नाही
शहाण्या माणसांच शहाणपण
वेडा कधी लुटत नाही.


माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.


भोग आहेत नशीबाचे भोगावे तर लागतीलच, आज पेरलेली रोपटी कालांतराने उगवतीलच.


माणसाचं मन मोठं विचित्र असतं. प्रेम आणि अहंकार, आशा आणि भीती यांचा पाठशिवणीचा खेळ तिथं अष्टौप्रहर चालतो. तो खेळ कधी संपत नाही आणि माणसाचं दु:ख कधी कमी होत नाही.


माझे ते खरे म्हणण्यापेक्षा खरे तेच माझे म्हणा.


माझ्या मते जगावं तर
पावसाच्या थेम्बां सारखा..
पाउस बरसत असतो तेव्हा
तुम्ही कधी पहिला आहे…
त्याचा थेंब अन थेंब
आनंदाने नाचत असतो…
आपण कुठे पडतो आहे
ह्याचा त्याला भानही नसतं
आणि विचारही नसतो…


मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.


भय म्हणजे मनुष्याचे अंत:करण, त्याला त्याच्या अपराधाबद्दल देत असलेला कर आहे…


मनातला कोणताही विचार कागदावर सहज येत नाही. तो आधी जगण्यात असावा लागतो.


मरण जवळ आलं म्हणून जगायचं कुणी थांबतं का !


मनुष्याची मुद्रा म्हणजे जीवनग्रंथ. डोळे म्हणजे तर जीवनातील अनुभवाने भरलेले डोह.


भावना बुध्दीपेक्षा अधिक हट्टी असते. युगायुगांचे संस्कार तिच्या कणाकणात भिनलेले असतात.


मनात प्रश्नाचे वावटळ जेंव्हा थैमान घालायला लागत तेंव्हा आयुश्याच गलबत दिशाहीन फिरायला लागत …


मनाच्या जखमेला सहानुभूतिशिवाय औषध नाही. अश्रूंनीच हृदये कळतात आणि अश्रूंनीच हृदये मिळतात.


Leave a Comment