रायगड किल्ला|Raigad Fort Information In Marathi

रायगड किल्ला|Raigad Fort Information In Marathi

Raigad fort

 

रायगड किल्ला हा भारताचा महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्याची स्थापना १०३० रोजी झाली. इथे अलीकडे पर्यटकांचा संख्येत वाढ झ़ाली आहे. किल्ल्याची उंची ८२० मीटर/२७०० फूट एवढी आहे. किल्ल्याच्या जवळचे गाव महाड आहे. तसेच सह्याद्रीच्या डोंगररांगा सुद्धा आहेत.
शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे.  किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातीलसह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे.  प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते.

युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला.

Raigad Fort Information In Marathi
Raigad Fort Information In Marathi

महाराजांनी ६ एप्रिल१६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते. गडावर राहण्यासाठी उत्तम सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे. एक मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा ७ ते ८ खोल्या आहेत. राहण्याची सोय विनाशुल्क आहे.

Leave a Comment