रक्षाबंधन निबंध मराठी मध्ये | Raksha Bandhan essay in Marathi

Raksha Bandhan essay in Marathi – नमस्कार Inmarathi.in मध्ये तुमचे स्वागत आहे . आज तुम्हाला रक्षाबंधन ह्या सणाचे स्वरूप काय तसेच त्याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखात देणार आहोत आणि ती तुम्हाला नक्कीच आवडेल.

Raksha Bandhan essay in Marathi रक्षाबंधन सणाला राखी असेही म्हणतात. भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. जसे राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, कजरी पौर्णिमा इत्यादी. तसेच या दिवशी नारळ भात करण्याची प्रथा आहे. रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीचा सण आहे. रक्षा बंधन हा हिंदू धर्मामध्ये साजरा केला जाणारा सण आहे.हा सण भाऊ बहिणीचा पवित्र सण आहे. हा सण श्रावणात साजरा केला जातो.श्रावण महिना हा हिंदू धर्मात शुभ मानला आहे.

Read More: Rakshabandhan wishesh in Marathi | रक्षाबंधनाच्या शुभेच्छा पाहण्यासाठी यावर क्लिक करा..

रक्षाबंधन निबंध मराठी मध्ये | Raksha Bandhan essay in Marathi

स्त्री वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावर पोहचलेली असो रक्षाबंधनाच्या ह्या उत्सवास तीच्या मनास माहेरची आस लागलेली असते. लग्नानंतर तीच्या भूमिकेत बदल झाला असला तरी माहेरची नाती, ऋणानुबंध ती आपल्या हृद्यात कायम जपून ठेवत असते. मुलगी, आई, पत्नी, बहिण, बहिणी अशा भूमिका पार पाडत ती एकाच वेळेस अनेक कर्तव्य पार पाडत असते. व्यवसाय, रोजगारासाठी घराबाहर पडावे लागत असल्याने सर्व भाऊ एकाच शहरात असणार याची खात्री देता येत नाही. बहिणही लग्न झाल्यावर सासरी जाते. त्यामुळे रक्षाबंधनास प्रत्यक्ष भेट होईलच असे सांगता येत नाही. बहुतेकवेळा भाऊ बहिणीकडे येऊन रक्षाबंधन साजरे करतात. कधीकधी बहीणही माहेरी येते. रक्षाबंधन हा मने जुळवणारा उत्सव आहे.

लग्न झाल्यानंतर बहिणीस माहेरी जोडून ठेवणारा दुवा म्हणून हे सण भूमिका पार पाडतात. यानिमित्ताने माहेरच्या माणसांशी तिची भेट होत असते. बहीण- भाऊ शेवटी एकाच मायबापांची लेकरे असतात. लहानपणापासून मोठेहोईपर्यंत सोबत वाढलेले असतात. परिस्थितीनुरूप बहीण-भाऊ एकमेकांपासून दूर असले तरी त्यांनी लहानपणापासूनच्या आठवणी हृद्यातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात. हा चिरंतन ठेवास कठीण प्रसंगी त्यांना आधार देत असतो.

बहीण-भाऊ एकमेकांचे प्रेरणास्त्रोतही असतात. आपली बहीण सुखात राहावी अशी‍ प्रत्येक भावाची मनोकामना असते. बहीण लहान असली तर भाऊ वडिलांचीच भूमिका पार पाडत असतो. लहानपरी तिला खेळवण्यापासून तिचा प्रत्यके हट्ट पूर्ण करण्यापर्यंत. दादाची ती लाडकी छकुलीच असते. आपल्या छकुलीने चांगले शिकावे, कर्तुत्वनान व्हावे अशीच दादाची इच्छा असते.

दादाला जसे आपल्या छकुलीचे मन कळत असते तसेच ताईही आपल्या लाडक्या भावाची काळजी घेत असते. मग ते लहान असोत की मोठे. रक्षाबंधन मनाचे बंध कायम जोडून ठेवण्याचे काम करत असतो.

raksha bandhan wishesh
रक्षाबंधन निबंध मराठी मध्ये | Raksha Bandhan essay in Marathi

 

हे देखील वाचा : 

सूर्य संपावर गेला तर..| surya sampavar gela tar marathi nibandh

मी मुख्यमंत्री झालो तर..| mi mukhyamantri jhalo tar marathi nibandh

मोबाईल नसते तर.. | Mobile naste tar nibandh in marathi

{Best} maza avadta khel marathi nibandh

मित्रानो तुमच्याकडे जर “रक्षाबंधन वर निबंध तसेच रक्षाबंधन सणाची माहिती” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते Raksha Bandhan information in Marathi | रक्षाबंधन निबंध मराठी article मध्ये update करू . मित्रानो  हि Raksha Bandhan essay in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share  करायला विसरू नका. तसेच आपण Raksha Bandhan essay in Marathi या लिखाचा वापर Raksha Bandhan information in Marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक
माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.in

Leave a Comment