Recipe in marathi cake – तर मित्रांनो केक खायला कोणाला आवडत नाही ? प्रत्येक वाढदिवशी तर एका व्यक्तीचे १-२ केक कापलेच जातात. तर प्रत्येक वेळी बाहेरूनच केक आणला पाहिजे असे नाही. तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा एखादा स्वादिष्ट केक बनवू शकता. चला तर मग बनवूया सॉफ्ट केक.
साहित्य:
- दीड कप मैदा
- अर्धा कप कोको पावडर
- एक कप पीठी साखर
- २ अंडी
- १/२ चमचा खायचा सोडा
- १ कप ताजे दही
- अर्धा कप वितळलेले लोणी
- एक लहान चमचा व्हॅनिला इसेंस
कृती :
- मैदा गाळून त्यात कोको पावडर व खायचा सोडा मिसळा.
- लोणी व अंड्याध्ये साखर घालून फेटा. त्यात दही मिसळा.
- आता यात मैदा थोडा-थोडा घालून मिसळत रहा.
- आता यात थोडेसे पाणी व एसेंस टाकून लाकडी चमच्याने हलवा.
- आता केक पॉट मध्ये तूप लावून मैदा लावा.
- मिश्रण पॉट मध्ये भरून ओव्हन मध्ये ३५० डिग्री फे. वर बेक करावे.
- केक थंड झाल्यावर त्यावर चॉकलेट बटर आइसिंग करावे.
हे सुद्धा वाचा :
Eggless cake recipe in marathi | एगलेस केक रेसिपी
Dhokla Recipe In Marathi | ढोकळा रेसिपी मराठी मध्ये