Sabudana Vada

साहित्य:


• १०० ग्राम साबुदाणा
• दिडशे ग्राम वरी तांदूळ
• १०० ग्राम राजगिरा
• १ टीस्पून जिरं


कृती:


• साबुदाणा, वरी तांदूळ, आणि राजगिरा गुलाबी रंग येईस्तोवर मंद आचेवर वेगवेगळे भाजावे.

• भाजलेले सर्व जिन्नस एकत्र करावे. त्यात जिरे न भाजताच घालावे.

• मिक्सरमध्ये एकदम बारीक करावे किंवा गिरणीतून बारीक दळून आणावे.

Sabudana vada recipe

टीप:

• साबुदाणा भाजण्यापूर्वी त्याला १ टीस्पून तूप लावून घ्यावे म्हणजे भाजताना कढईला चिकटणार नाही.

• साबुदाणा, वरी, राजगिरा खूप जास्त रंग बदलेस्तोवर भाजू नये. त्यामुळे भाजणीचा रंग डार्क येतो आणि चवही चांगली नाही.

• जिरे भाजू नये. कच्चेच घालून भाजणी दळावी.

• आवडीनुसार साबुदाणा, वरी, राजगिरा यांचे प्रमाण कमीजास्त करू शकतो. बऱ्याच जणांना साबुदाण्याचा त्रास होतो. त्यांनी साबुदाणा कमी करून वरी किंवा राजगिरा यांचे प्रमाण वाढवावे.

Leave a Comment