Sant Eknath information in marathi | संत एकनाथ

sant eknath information in marathi – सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ हे महाराष्ट्तील वारकरी संप्रदायातले एक संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत असत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते तसेच आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार कमी काळ लाभला. एकनाथांचे पालनपोषण आजोबांनीच केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत.
नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना दोन मुली व एक मुलगा झाला त्यापैकी दोन्ही मुलींची नावे गोदावरी व गंगा असे आहे व मुलाचे नाव हरी असत. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने एकनाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी दरवर्षी नाथांच्या पादुका आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.
सद्गुरू जनार्दनस्वामी हे एकनाथांचे गुरू होते. हे मुळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते.
नाथांनी परिश्रम करून गुरूसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शनही दिले.

‘बये दार उघड’ असे म्हणत एकनाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. तसेच ‘एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.

संत एकनाथ महाराजांची थोडक्यात माहिती (sant eknath information in marathi)

नावसंत एकनाथ महाराज
जन्मई.स. १५३३
जन्म ठिकाण पैठण
आईचे नाव रुक्मिणी
वडिलांचे नाव सूर्यनारायण
मुलांची नावे गोदावरी, गंगा, हरी
मृत्यू ई.स. १५९९

10+ संत एकनाथ महाराजांची अभंग गाथा (sant eknath abhang gatha)

ॐ नमो सदगुरुनिर्गुणा । पार नाहीं तंव गुणा । बसोनि माझिया रसना । हरिगुणा वर्णवीं ॥१॥
हरिगुण विशाळ पावन । वदवीं तूं कृपा करुन । मी मूढमती दीन । म्हणोनि कींव भाकितसें ॥२॥
तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण । हरिगुण वर्णीन मी जाण । एका वंदितसें चरण । सदगुरुचें आदरें ॥३॥

.

नमो व्यासादिक कवी हे पावन । जे परिपूर्ण धन भांडाराचें ॥१॥
करुनी उपदेश तारिलें बहुतां । उपदेश तत्त्वतां चालतसे ॥२॥
एका जनार्दनीं तुमचा मी दास । येवढी ही आस पुरवावी ॥३॥

.

परा पश्यंती मध्यमा वैखरी । नमियेली खरी आदिमाया ॥१॥
वसोनिया जिव्हे वदावेम कवित्व । हरिनामीं चित्त निरंतर ॥२॥
आणिक संकल्प नाहीं माझे मनीं । एका जर्नादनीं वंदितसें ॥३॥

.

असतां बंदिशाळें । देवकी डोहळे । गर्भ घननिळे । आथियला ॥१॥
गुज पुसे भ्रतारा । आनु नेणें दुसरा । आवडी अवधारा । जिवा होय ॥२॥
मेळवुनि लेंकुरी । खेळ खेळावा साकार । गोकुळीं अवतार । गौळीया घरीं ॥३॥
वर्षतां शिळाधारीं । उचलवा माहागिरी । वेणु पावे करीं । वाजवीत ॥४॥
जळीं रिघ करावा । भवसर्प नाथावा । वरि बैसो बरवा । भाव माझा ॥५॥
कंसादिक वीर । त्यांचा कारावा संहार । ईजे राज्यधर । उग्रसेना ॥६॥
एक यश द्यावें त्रैलोक्य जिंकावें । कनकपूर बसवावें । सिंधुमाजीं ॥७॥
एका जनार्दनीं । डोहाळे संपूर्ण । पुरवी नारायणा । वासनेचे ॥८॥

.

देवकी निज उदरीं । गर्भाजी पाहे थोरी । तंव सबाह्म अभ्यंतरीं । व्यापक श्रीकृष्ण ॥१॥
अगे हा स्वतः सिद्ध हरी । स्वयंप्रकाश करीं । मीपणा माझारी । गर्भु वाढे ॥२॥
आतां नवल कैसे परी । आठवा गर्भु धरी । त्याहि गर्भा माझारीं मज मी देखे ॥३॥
दाहीं इंद्रियां माझारीं । गर्भांची वाढे थोरी । कर्म तदाकारीं । इंद्रिय वृत्ति ॥४॥
चितप्रकाशासी डोहळे । सद्रूप सोहळे । आनंद कल्लोळे गर्भू वाढे ॥५॥
तेथें स्वस्वरुपस्थिती सुखरुप प्रसुती । आनंद त्रिजगतीं परिपूर्ण ॥६॥
एका जनार्दनी । ज्ञानगर्भु सार । चिद्रुप चराचर । निखळ नांदे ॥७॥

.

देवकी करी चिंता । केवीं आठवा वांचे आतां । ऐसी भावाना भावितां । जिवीं तळमळ ॥१॥
तंव न दुखतांचि पोट । वेण न लगतां उद्धट । कृष्ण झाला प्रगट । स्वयें अयोनिया ॥२॥
हरि सुनीळ सांवळें । बाळ निजतेजे तेजाळें । देखोनि वेल्हाळे । स्वयं विस्मीत ॥३॥
ऐसें देखोनि श्रीकृष्णासी । मोहे आच्छादुं जाय त्यासी । तंव प्रकाशु तियेंसीं । कैसा आंवरेना ॥४॥
वेगीं वसुदेवातें म्हणे । तुम्हीं गोकुळांसी न्या तान्हें । एका जनार्दनें कृपा केलीं ॥५॥

.

देवकी म्हणे वसुदेवासी । वेगीं बाळके न्यावें गोकुळासी । घवघवीत तेजोराशी । देखे श्रीकृष्ण ॥१॥
पूर्ण प्रकाश निजतेजें । पाहतां न दिसें दुजें । तेथें कैंचे माझें तुझें । लपणें छपणें ॥२॥
सरसर अरजे दुरी । परब्रह्मा आम्हां छरीं । अहं कंसाचे भय भारी । बाधी कवणा ॥३॥
सवेचि पाहे लीळा ।मुगुट कुंडले वनमाळा । कंठीं कौस्तुभ तेजाळा । कळी तटी सुत्र ॥४॥
क्षुद्र घंटिका किंकणी । बाहु भूषणें भुषणीं । चिद्रेत्नें महामणी । वीर कंकणें ॥५॥
कमलवदन हरी । कमले नेत्रधारी । लीला कमळे करी । झेलीतसे ॥६॥
करकमळीं कमळा । सेवी चरणकमळा । ऐशी वसुदेव देखे डोळां । दिव्य मूर्ति ॥७॥
लक्ष्मी डवल उनियां जाण । हृदयीं श्रीवत्सलांछन । द्विजापदांचे महिमान । देखे दक्षिणाभागीं ॥८॥
शंख चक्रादि आयुधें चारी । पीतांबर धारी । सगुण निर्गुण हरि । समसाम्य ॥९॥
ऐसे सगुण निर्गुण भाका । पहात पहात देखा । भिन्न भेदाचि न रिघे रेखा । कृष्णापणीं ॥१०॥
एका जनार्दनीं खरें । निजरुप निर्धारें । अहं कंसाचे वावरे । मिथ्या भय ॥११॥

.

देवकी वसूदेवाकडे पाहे । तंव तो स्वानंदे गर्जताहे । येरी धावोनि धरी पाये । उगे रहा ॥१॥
जळो जळो हे तुमची बुद्धी । सरली संसारशुद्धी । कृष्ण लपवा त्रिशुद्धी । जग प्रगट न करावा ॥२॥
आतां मी करुं कैसें । भ्रतारा लागलें पिंसे । मज मायेच्या ऐसें । पुरुष ममता न धरी ॥३॥
मज मायेची बुद्धी ऐसी । म्यां आच्छादिलें श्रीकृष्णांसी । वेगें होईन तुमची दासी । अति वेगेंशीं बाळ न्यावें ॥४॥
येरु म्हणे नवल जालें । तुज कृष्णें प्रकाशिलें । त्वां केवीं अच्छादिलें । कृषरुप ॥५॥
सरसर अरजे मूढें । बोलसी तितुकें कुडें । कृष्णरुप वाडें कोडें । माया कैंची ॥६॥
येरी म्हणे सांडा चावटी । कोरड्या काय सांगू गोष्टी । गोकुळासी उठाउठी । बाळ न्यावें माझें ॥७॥
अवो कृष्णीं चिंतीसी जन्ममरण । हेंचि तुझें मूर्खपणा । कृष्णानामें जन्ममरण । समूळ निर्दळिलें ॥८॥
सरो बहु बोलाचा बडीवारु । परि निर्धारु न धरवे धीरु । या लगीं लेकरुं । गोकुळा न्यावें ॥९॥
तुम्हीं न माना माझिया बोला । वेणेंवीण उपजला । नाहीं योनिद्वारां आला । कृषाणानाथु ॥१०॥
आतां मी काय करुं वो । वसुदेव म्हणे नवलाओ । तुझ्या बोलाचा अभिप्रावो । तुझा तुमची न कळे ॥११॥
चोज कैसेवीण । ज्या नाहीं जन्ममरण । त्यासी मारील कवण । समुळ वावो ॥१२॥
जेणें मीपण आभासे । तेणें माझें मूर्खपणें तुम्हां दिसें । हें अंगींचे निजरुप पिसें । न कळें तुम्हां ॥१३॥
कृष्ण निजबोधु सुंदरा । यासी जीवें जतन करा । जाणिवेच्या अहंकारा । गुंता झणीं ॥१४॥
आतां काय मीं बोलुं शब्दू । ऐसा करितां अनुवादू । बोले खुंटला शब्दू । प्रगटला कृष्ण ॥१५॥
प्रकृति पुरुष दोन्हीं । मीनली एकपणीं । एका जनार्दनीं । बंदी मोक्ष ॥१६॥

.

गोकुळीं आनंद जाहला । रामकृष्ण घरा आला । नंदाच्या दैवाला । दैव आलें अकस्मात ॥१॥
श्रावण वद्य अष्टमीसीं । रोहिणी नक्षत्र ते दिवशी । बुधवार परियेसी । कृष्णमूर्ति प्रगटलीं ॥२॥
आनंद ब समाये त्रिभुवनी । धांवताती त्या गौळणी । वाण भरुनी नंदराणी । सदनाप्रती ॥३॥
एका जनार्दनी अकळ । न कळे ज्याचें लाघव सकळ तया म्हणती बाळ जो म्हणती बाळ । हालविती ॥४॥

.

निळी कांच भूमीं खेळे वनमाळी । पाहिलें प्रतिबिंब कृष्णं तया न्याहाळीं ॥१॥
रडूं घेतलें रडूं घेतलें । समजावी यशोदा परी रडूं घेतलें ॥२॥
दे मज खेळावया भानु । आन नको कांही दुजा छंद मनु ॥३॥
एका जनार्दनीं देव छंद धरी गा । समजावी यशोदा परी न राहे उगा ॥४॥

.

एके दिनी नवल जालें । ऐकवें भावें वहिलें ॥१॥
घरीं असतां श्रीकृष्ण । योगीयाचें निजध्यान ॥२॥
नंद पूजेसी बैसला । देव जवळी बोलाविला ॥३॥
शाळीग्राम देखोनि । मुखांत घाली चक्रापाणी ॥४॥
नंद पाहे भोवतालें । एका जनार्दनी बोले ॥५॥

.

म्हणे कृष्णराया शाळीग्राम देई । येरू लवलाही वदन पसरी ॥१॥
चवदा भुवनें सप्त तीं पाताळें । देखियलीं तात्काळें मुखमाजीं ॥२॥
स्वर्गीचे देव मुखामाजी दिसती । भुलली चित्तवृत्ति नंदराव ॥३॥
एका जनार्दनी नाठवें भावना । नंद आपणा विसरला ॥४॥


हे सुद्धा वाचा :

Read More: संत तुकाराम महाराज | Information about sant tukaram in marathi

Read More: सावित्रीबाई फुले | savitribai phule information in marathi

Read More: संभाजी महाराज| sambhaji maharaj information in marathi

Read More: महात्मा गांधी | mahatma gandhi information in marathi


Leave a Comment