Savitribai Phule Information In Marathi | सावित्रीबाई फुले

Savitribai Phule Information In Marathi

सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीका होत्या तसेच त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि आशिया खंडात पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला.

याव्यतिरीक्त त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हंटल्या जातं. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता खर्ची घातले.

जन्म ३ जानेवारी इ.स १८३१ नायगाव, सातारा, महाराष्ट्र.
मृत्यू १० मार्च इ.स १८९७ पुणे, महाराष्ट्र.
टोपणनावे क्रांतीज्योती, ज्ञानज्योती
धर्म हिंदू
वडील खंडोजी नेवसे
आई सत्यवती नेवसे
पती ज्योतिराव फुले
अपत्ये यशवंत फुले
पुरस्कार क्रांतीज्योती
चळवळ मुलींची पहिली शाळा सुरू करणे
संघटना सत्यशोधक समाज
savitribai phule details
savitribai phule and jyotiba phule
savitribai phule information in marathi

चरित्र :


       स्त्री स्वातंत्र्य नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पण बंधनांचा अर्थच ज्या वयात कळत नाही, त्या वयापासूनच त्यांनी आपल्या कार्याला त्यांच्याही नकळत सुरुवात केली. एका दुबळ्या मुलाचे फुल हिसकावून घेणार्‍याला त्यांनी अद्दल घडविली, तर पक्ष्यांची अंडी खाणार्‍या नागाला त्यांनी ठेचून मारले. सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणत. सावित्रीबाईंचा ज्यावेळेस विवाह झाला त्यावेळेस बालविवाहाची परंपरा होती. तेव्हा सावित्रीबाईं नऊ वर्षाच्या होत्या तर तसेच ज्योतिबाराव 12 वर्षांचे होते. त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून अक्षर ओळख करून घेतली.
सावित्रीबाईनी शिकण्यासाठी खूप संघर्ष केला तसेच या रुढी तोडण्यासाठी सावित्रीबाईंनी पती ज्योतीबांच्या सहाय्याने १ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. ही शाळा भारतातील पहिले महाविद्यालय ठरले.

 

Read More : sambhaji maharaj information

 

savitribai phule university
savitribai phule university

केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले.

स्त्रियांना कसे शिकवावे याचा पाठ घेण्यासाठी त्या अहमदनगरला जाऊन राहिल्या आणि एक उत्तम शिक्षिका म्हणून १८५२ साली सरकार दरबारी तिचा सन्मान झाला. जोतीरावांनी त्यांना समाजाची दिशा दाखवली. अशा तऱ्हेने त्या देशाच्या पहिल्या शिक्षिका बनल्या . सावित्रीबाई नेहमी म्हणायच्या विनाकारण वेळ व्यर्थ घालवू नका शिक्षण प्राप्त करा . पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन” म्हणून साजरा केला जातो.

Read More : Top good morning quote 

savitribai phule information in marathi

savitribai phule jayanti
savitribai phule jayanti

अनेक शाळांची निर्मीती ( Creation of school) :

पती ज्योतिबा फुले यांच्या मदतीने कुणाचेही आर्थिक सहाय्य न घेता 1 जानेवारी 1848 पासुन 15 मार्च 1852 पर्यंत मुलींच्या शिक्षणाकरता त्यांनी 18 शाळा सुरू केल्या. 1849 ला पुणे इथं उस्मान शेख या मुस्लीम बांधवाच्या घरी मस्लिम महिलांना आणि लहान मलांना शिक्षीत करण्याच्या उद्देशाने त्यांनी शाळा सुरू केली. महिलांच्या शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरीत सावित्रीबाई सतत या क्षेत्रात काम करीत राहिल्या. सावित्रीबाईंचे आणि ज्योतिबांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान पाहुन 16 नोव्हेंबर 1852 ला ब्रिटीश शासनाने त्यांचा यथोचित गौरव केला.

savitribai phule pune university
savitribai phule pune university 

इतर क्षेत्रातील कार्य (Social Work) –

केवळ शिक्षण क्षेत्रापुरते त्यांचे कार्य मर्यादित नव्हते. विधवांची परिस्थीती सुधारावी म्हणुन, बालकांच्या हत्या थांबाव्यात (विशेषतः स्त्रि भृण हत्या) म्हणुन त्यांनी आश्रमाची उभारणी केली दलित आणि अस्पृश्य समाजाकरता त्यांनी कार्य केलं.

सावित्रीबाई फुले या चांगल्या विचारांच्या त्या एक कवयित्री होत्या. सावित्रीबाईंचे “काव्यफुले” आणि “बावनकशी सुबोध रत्नाकर” असे दोन कवितासंग्रह उपलब्ध आहेत. या कविता संग्रहातून त्यांनी त्यांचा सत्याचा शोध घेतला.

Read More : Real base best motivational story

१) काव्यफुले :

१८५४ साली तिचा “काव्यफुले” हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. ” काव्यफुले ” या काव्यसंग्रहाला नाव देण्यामागे फुले या शब्दाची गुंफण आहे. या काव्यसंग्रहात गुंफलेला ‘फुले’ हा शब्द एकाचवेळी दोन गोष्टी स्पष्ट करतो. फुले हे त्याच्या घराण्याचे नाव वडिलोपार्जित फुलांचा व्यवसाय. सावित्रीचे भावविश्व फुलांनी बहरून गेले. या संग्रहातील फुलाविषयीच्या कवितांचा अविष्कार अत्यंत आधुनिक आहे. अविष्कार पद्धती आधुनिक मराठी काव्यात फार पूर्वीपासून होती, व तिचा उगम सावित्रीबाईंच तारुण्सुलभ कवितेत आहे.

कोण कुठली। कळी फुलांची
जुनी विसर। नवीन पाही
रीत जगाची। उत्सृखल ही
पाहुनिया मी । स्तिमित होई

वयाच्या तेवीस चोविसाव्या वर्षीच त्यांनी लिहिलेल्या या कविता संग्रहातून क्रांतिकारी विचार निसर्गाचे चौफेर उधळण करणारे काव्यसुमने रचली आहेत. पिवळा चाफा, जाईचे फूल, जाईची कळी, गुलाबाचे फुल, फुलपाखरू, फुलाची कळी या कवितेतील शीर्षकावरून सावित्रीबाईंचे भावविश्व फुलांनी बहरून आले आहे. हे सगळं करताना त्यांनी कणखर कष्ट उचलले, तसेच अनेक संकटाचा सामना सुद्धा केला. त्यातच त्यांनी स्त्री शिक्षणाची ‘ ज्ञानज्योती ‘ प्रज्वलित केली.

savitribai phule speech

savitribai phule information in marathi

 

काळरात्र गेली | अज्ञान पळवले
सर्व जागे केले | या सूर्याने ||
शूद्र या क्षीतीजी | ज्योतिबा हा सूर्य ||
तेजस्वी अपूर्व | उगवला ||

या कवितेतून मानवी भावभावनांचे दिग्दर्शन केले.

२) बावन्नकशी सुबोध रत्नाकर

१८११ साली जोतिरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी जोतिरावांचे एक पद्यमय चरित्र लिहिले आहे. त्याचे नाव ” बावन्नकशी सुबोध रत्नाकर ” हा काव्य चरित्रग्रंथ दस्तुरखुद्द सावित्रीनेच लिहिला आहे. फुले चरित्राबाबत तो अत्यंत विश्वसनीय दस्तऐवज मानला पाहिजे. या चरित्रग्रंथाला बावन्नकशी म्हटले आहे. त्यात बावन कडवी आहेत. लग्न झाले तेव्हापासून जोतिराव आपली पत्नी सावित्री आणि ‘आऊ’ सगुणाबाई यांनासुद्धा शिक्षणाचे पाठ देत असे हे चरित्र सांगते. म्हणूनच या चरित्रकाव्यग्रंथात कृतज्ञतेची भावना अभिव्यक्त झालेली आहे.

savitribai phule information in marathi

सावित्रीबाईंचे निधन (Savitribai Phule Death) –

ज्योतिबा फुलेंच्या निधनानंतर सुध्दा त्या सतत कार्यमग्न राहिल्या आणि समाजाचे ऋण फेडत राहिल्यात. 1897 ला
पुण्यात महाभयंकर अशी “प्लेगची” साथ सुरू झाली. सावित्रीबाईंनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता रूग्णांची
सेवासुश्रृषा त्या करीत राहिल्या अश्यातच त्यांना देखील या
आजाराने ग्रासले आणि त्यातच 10 मार्च 1897 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. समाजाप्रती त्यांच्या अतुल्य अश्या योगदानाला कधीही विसरता येणार नाही. महिलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि केंद्र सरकार ने त्यांच्या नावाने अनेक पुरस्कारांची निर्मीती केली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक डाक तिकीट देखील काढण्यात आले आहे.

Read More :  देवाक काळजी रे marathi song lyrics…

Read More : Top good morning quote 

Leave a Comment