Cricket News In Marathi: चौथ्या क्रमांकावर कोण करणार फलंदाजी? २०२३ मध्ये होणाऱ्या विश्वचषक भारतासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. आणि याच मार्गावर भारतीय संघाने बंगलोर मध्ये जोरदार तयारी चालू केली आहे.परंतु भारतीय संघासाठी विजय रस्ता सुनिश्चित करण्यासाठी भारतीय संघातील सर्वच खेळाडूंची कामगिरी चांगली असणे गरजेचे आहे.
भारत साठी नेहमीच चौथ्या क्रमांकाच्या जागेवर कोण खेळणार नेहमीच पेचाच ठरल आहे.आणि खूप वर्ष पासून या साठी चांगल्या खेळाडूच्या शोधत भारतीय संघ आहेच.अश्याच वेळी श्रेयस अय्यर या जागी चांगली कामगिरी करेल आशी खात्री होती.आणि त्याला मिळालेली संधीचा त्यांनी सोनं करून दाखुन भारतीय चाहत्यांचा मन जिंकला होता.
परंतु हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला आणखी वेळ लागेल. याशिवाय तो विश्वचषक स्पर्धेतूनही बाहेर जाऊ शकतो, ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. अय्यरने पाठीच्या खालच्या भागावर शस्त्रक्रिया केली आहे. बीसीसीआयने खेळाडूंच्या दुखापतीच्या अपडेटबाबत नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात या दोघांच्या पुनरागमनाबद्दल कोणताही उल्लेख नाही.
अय्यर भारतीय संघासाठी तंदुरुस्त नसेल तर चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. किंबहुना,बीसीसीआयच्या आहवलावरून शक्यता श्रेयस अय्यर आशिया कपमध्ये नसण्याची आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची आशा मोड होऊ शकते आणि अशा स्थितीत टीम इंडियाच्या नंबर ४ बाबत अडचणी वाढू शकतात.