stories with moral in marathi | सुंदर छान छान मराठी गोष्टी | Stories In Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर तुम्ही stories with moral in marathi, सुंदर छान छान मराठी गोष्टी ,संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला आमच हे stories with moral in marathi, कलेक्शन नक्की आवडल ,जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आवशय भेट दया…

Stories With Moral In Marathi | सुंदर छान छान मराठी गोष्टी | Stories In Marathi

मुर्ख डोमकावळा

एका गरूडाने कुरणात चरत असलेल्‍या मेंढ्यांच्‍या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्‍या कोकराला पळवून नेले. त्‍याचे हे धाडस आणि सामर्थ्‍य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्‍या गरूडाकडे भीतीयुक्‍त आदराने पाहू लागले.

‘गरूडाने पळवले त्‍यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्‍मान वाढेल, त्‍याच्‍याइतकीच प्रतिष्‍ठा आपल्‍याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले.
त्‍यासाठी त्‍याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्‍या पाठीवर बसून त्‍याला उचलण्‍याचा प्रयत्‍न केला .

पण ते कोकरू उचलले जाण्‍याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्‍या पाठीवरील लोकरीमध्‍ये अडकले व तिथून सुटण्‍यासाठी त्‍याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्‍या कानी गेली.

तो तिथे आला व त्‍याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्‍याला स्‍वत:च्‍या मुलांच्‍या स्‍वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,”बाबा या पक्ष्‍याचे नाव काय हो” यावर तो मेंढपाळ हसून म्‍हणाला,” या मूर्ख पक्ष्‍याला जर तुम्‍ही याचे नाव विचारले तर हा स्‍वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्‍ठ असा पक्षी म्‍हणून स्‍वत:ची ओळख करून देईल पण प्रत्‍यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.”

तात्‍पर्य: काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्‍याची प्रचंड सवय असते. यामध्‍ये त्‍यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्‍यांची पात्रता जाणून असतात.

नक्की वाचा : वाढदिवसाच्या शुभेच्छा  वाचण्यासाठी यावर क्लिक करा..

अति तेथे माती

एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी सांगितले की ‘तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर. तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल’. तो त्याप्रमाणे करतो. इंद्र प्रसन्न होतो.

इंद्र त्याला म्हणतो, की ‘तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईत. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. ‍ तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो. तेवढ्या पैशांवर तो आनंदीत होतो. त्यानंतर तो गावात येतो. चांगले कपडे घेतो, घर बांधतो.

त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास ? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुध्दा गावाबाहेर जातो. इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो. तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते. सर्व पैसे खाली पडतात व त्यांची माती होते. त्याचबरोबर इंद्रही नाहीसा होतो. त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही.

तात्‍पर्य: कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा.

लाडूची चोरी

पूर्वीच्‍या काळची गोष्‍ट आहे, दोन तरूण एका मिठाईच्‍या दुकानात गेले, दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहेसे पाहून त्‍यातल्‍या एका मुलाने जवळच असलेल्‍या एका थाळीतील एक लाडू उचलला आणि दुस-या मुलाच्‍या हाती दिला, त्‍याने तो लाडू पटकन खिशात टाकला, थाळीतील एक लाडू कमी झाल्‍याचे लक्षात येताच तो हलवाई त्‍या तरूणांना म्‍हणाला,”तुम्‍ही दोघेच जण इथे आहात तेव्‍हा तुम्‍हां दोघांपैकीच कोणीतरी एकाने तो लाडू चोरला आहे,”

यावर प्रत्‍यक्षात लाडू चोरणारा तरूण म्‍हणाला,”देवाशप्‍पथ, मी खरं सांगतो की लाडू माझ्याकडे नाही.” ज्‍याच्‍या खिशात तो लाडू होता, तो तरूण म्‍हणाला,” देवाशप्‍पथ खरंच सांगतो मी लाडू मुळी चोरलेला नाही.” दुकानदाराला खरे काय ते माहित असूनही केवळ यांच्‍या भाषिक कसरतीमुळे त्‍यांची चोरी सिद्ध करू शकला नाही.

तात्‍पर्य: भाषेच्‍या कसरतीमुळे एखादा इसम निरपराधी असल्‍याचे सिद्ध करता आले नाही तरी प्रत्‍यक्षात तो अपराधी असू शकतो.

नक्की वाचा: funny status for whatsapp  विनोदी स्टेटस वाचण्यासाठी यावर क्लिक करा..

धनाचा विनियोग

एकदा एक कोल्‍हा जमिनीत बीळ खणत असताना खूपच खोल खणत गेला. खूप खोल गेल्‍यावर त्‍याला तिथे एक धनाचा हंडा दिसला व त्‍यावर एक वृद्ध नाग त्‍या धनाचे रक्षण करत होता.

कोल्‍ह्याने नागाला विचारले,”हे नागदेवता, तुम्‍ही इथे काय करता आहात.” नाग म्‍हणाला,” माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्‍या धनाचे मी रक्षण करत आहे.” मग कोल्‍हा पुन्‍हा म्‍हणाला,” पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्‍ही कधी त्‍याचा उपभोग घेतला आहे किंवा नाही.

उपभोग सोडा थोडंफार धन दानापोटी तरी खर्च केलंत काय” नाग म्‍हणाला,” कसं शक्‍य आहे, हे धन कमी होऊ नये म्‍हणून तर मी स्‍वत: या धनाचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे. त्‍याचा उपभोग घेणे किंवा दुस-याला दान देणे ह्यापेक्षा या धनाचे रक्षण करण्‍यातच मला जास्‍त आनंद आहे.”

हे ऐकून कोल्‍हा नागाला म्‍हणाला,” मग नागदेवा, तुमच्‍या असल्‍या या श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा. ज्‍या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्‍यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग”

तात्‍पर्य – ज्‍या धनाचा योग्‍य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्‍या धनाचा मनुष्‍यमात्राला काहीच फायदा नाही.

धाडसी झुगी

झुगी नऊ-दहा वर्षांची मुलगी. ती आणि तिचे आईबाबा शेतातील झोपडीत राहत. तिचे आईबाबा शेतात काम करत.सायंकाळ झाली. झुगी अभ्यास करत बसली होती. झोपडीबाहेर कोकरू बांधले होते. झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवला. झुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले आणि विहिरीवर पाणी आणायला गेली.

तेवढ्यात कोकराचा बँऽऽ बँऽऽ ओरडण्याचा आवाज आला. तशी झुगी धावतच झोपडीबाहेर आली. तिला एक लांडगा दिसला. तो कोकराकडे येत होता. झुगी घाबरली. क्षणभर विचार केला. ती झटकन झोपडीत गेली. चुलीतील जळते लाकूड घेऊन बाहेर आली. लांडगा कोकरावर झडप घालणार इतक्यात झुगीने जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले. आगीला पाहून लांडगा घाबरला. तो पळाला. कोकराचा जीव वाचला, ‘पळा पळा, लांडगाड

पळाऽ’, झुगी जोरजोरात ओरडू लागली. तिच्या आवाजाने शेतात काम करणारे बाबा धावत आले. आईही आली. झुगीने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. आईने तिला जवळ घेतले. बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. झुगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली. गावच्या सरपंचांनी तिची पाठ थोपटली. शाळेतील शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

नक्की वाचा: funny poems विनोदी कविता वाचण्यासाठी यावर क्लिक करा..

stories with moral in marathi

नक्की वाचा: sambhaji maharaj information वाचण्यासाठी यावर क्लिक करा..

नक्की वाचा: good morning msg in marathi वाचण्यासाठी यावर क्लिक करा..

Leave a Comment

बाजीप्रभू देशपांडे | bajiprabhu deshpande | पावनखिंड लढाई {Best} Breakup status in marathi Rakshabandhan wishesh in marathi 2022 | रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 2022 new year marathi wishes| नवीन वर्षाच्या शुभेच्छा kashmir files movie download review | kashmir files International Women’s Day • 2022 good morning quotes in marathi
बाजीप्रभू देशपांडे | bajiprabhu deshpande | पावनखिंड लढाई {Best} Breakup status in marathi Rakshabandhan wishesh in marathi 2022 | रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 2022 new year marathi wishes| नवीन वर्षाच्या शुभेच्छा kashmir files movie download review | kashmir files International Women’s Day • 2022 good morning quotes in marathi