swami samarth tarak mantra | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

अक्कलकोटचे स्वामी म्हणून ओळखले जाणारे स्वामी समर्थ दत्तात्रेय पंथातील भारतीय आध्यात्मिक गुरु होते. (tarak mantra of swami samarth)

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

नि: शंक हो निर्भय हो मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी

जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला

उगाची भितोसी भय हे पळु दे
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा

खरा होई जागा श्रद्धेसहीत
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात
नको डगमगु स्वामी देतील साथ

विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती


अक्कलकोटचे स्वामी म्हणून ओळखले जाणारे स्वामी समर्थ दत्तात्रेय पंथातील भारतीय आध्यात्मिक गुरु होते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशसह विविध भारतीय राज्यांमधील ते एक प्रख्यात अध्यात्मिक व्यक्ती आहे.

श्री स्वामी समर्थ  हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोटयेथे खूप काळ वास्तव्य केलेलेश्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले.(tarak mantra of swami samarth)


श्री स्वामी समर्थ मालामंत्र

॥ श्रीगणेशाय नमः ॥

जगदंबिका म्हणे । मालामंत्र नारायणे।
कथिला जो जगत्कारणे । तो हा सर्वोत्तम असे ॥

ॐ नमो नमो भगवंता । नमोजी श्री स्वामी समर्था ।
स्मरणगामी दत्तनाथा । योगीमुनिजनवंदिता ॥

बालोन्मत्ता पिशाच्चवेषा । महायोगीश्वरा परमहंसा ॥

चित् चैतन्या चिरंतना । अवधूता निरंजना |
जगदाधारा सुदर्शना । सुखधामा सनातना ॥

सकलकामप्रदायका । सकलदुरितदाहका |
सकल संचित कर्महरा । सकल संकट विदारा ॥

ॐ भवबंधमोचना । ॐ श्री परम ऐश्वर्यघना|
ॐ स्वां स्वहितधर्मचालका । ॐ मां नित्यदायका ॥

ॐ संसारचक्र छेदका । ॐ मां महाज्ञानप्रदायका|
ओमर्थं महावैराग्य-साधका । ॐ नं नरजन्मसार्थका ॥

ॐ मां महाभयनिवारका । ॐ भक्तजनहृदयनिवासा |
परकृत्या थोपव थोपव । परमंत्रा शांतव शांतव ॥

परयंत्रा विखर विखर । ग्रहभूतादिपिशाच्च पीडा हर हर |
दारिद्र्यदु:खा घालव घालव । सुखशांती फुलव फुलव ॥

आपदा विपदा मालव मालव । गृहदोष वास्तुदोष |
पितृदोष सर्पदोषादि । सर्वदोषा विरव विरव ॥

अहंकारा नासव नासव । मन चित्तबुद्धी स्थिरव स्थिरव |
नमोजी नमो देव महादेव । देवाधिदेव श्री अक्कलकोट ॥


स्वामी समर्थ गुरुदेव ॥
नमो नमो नमो नमः ॥ (सप्तशते सिद्धिः) ॥

॥ हरि ॐ॥


Read More : Hanuman chalisa ( हनुमान चाळीसा ) 👈

Read More : सकाळची भक्तिगीते 👈

Read More : आरोग्या बद्दल माहिती (Health Tips) 👈


 

Leave a Comment