पुण्यातील स्वारगेटला ‘स्वारगेट’ हे नाव कसे पडले? | swargate in pune

पुण्यातील स्वारगेट जुन्या काळी शिवाजी महाराजांच्याकाळात मुळा नदीच्या किनारी पुनवडी नावाचे गाव होते.महाराजणी कसबा पेठेव जवळ लाल महाल बांधला.” “तिथे वस्ती वाढू लागली.पण स्वराज्यावर आक्रमणे होऊ लागली.जशी वस्ती वाढत होती तसेच चौक्या किंवा नाक्यावरचे ठिकाण बसत होते. ही महत्वपूर्ण ठिकाणं इंग्रजांच्या काळातही तशीच राहिली. इंग्रज काळातील कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार झाले. आणि नाके किंवा चौकी असे न राहता त्याचे नाव ‘गेट’ असे झाले. म्हणून घोडेस्वार तैनात असलेले नाक्याचे ठिकाण पुढे “स्वारगेट” असे ओळखले जाऊ लागले. आजतागायत ते नाव तसेच राहिले आहे.(पुणे काबीज केल्यावर औरंगजेबाला ते खूपच आवडले. त्याने या शहराला ’मुहियाबाद’ नाव दिले होते)

Read More : पुण्यातील बाहुबली थाळी चे रहस्य जाणून घेण्यासाठी यावर क्लिक करा

सातारा ही राजधानी म्हणून छत्रपती शाहूमहाराजांनी बसवलेली होती. तेव्हा या नाक्यावरून रस्ता कात्रजमार्गे साताऱ्याला जात असे. त्यामुळे या मोक्याच्या जागेवर पेशवाईत या चौकीचा उपयोग तपासणीसाठी, जकात वसूल आणि इतर सामाजिक सुरक्षितेसाठी करण्यासाठी सुद्धा होत असे. स्वारगेट सोडून कोंढवा गेट क्वार्टर गेट जाईचे गेट पूल गेट पेरू गेट फडगेट मरीआई गेट म्हसोबा गेट, रामोशीगेट, पुलगेट ही गेट आजही पुण्यात अस्तित्वात आहेत. पैकी रामोशीगेट येथे चौक्यांवर पहारेकरी म्हणून रामोशी समाजातील लोकांची नेमणूक केली जायची. त्यावरून तिथल्या जागेला ‘रामोशीगेट’ असे नाव मिळाले.स्वारांचा पहारा or गेट या जागेवर पूर्वी होते त्यामुळे नाव ”स्वारगेट” पडले.

Read More : आई’ या शब्दावर सुंदर कविता वाचण्यासाठी यावर क्लिक करा.

Read More : पुण्यातील स्वारगेट

स्वरगेटला पुण्याकरिता मेजर बसस्थानक आहे. हे कात्रज – स्वारगेट आणि हडपसर – स्वारगेट बस मार्गांसाठी बीआरटीएस टर्मिनल म्हणून काम करते. आयकर कार्यालय, पीएमसी शाखा (स्वारगेट) आणि इतर व्यावसायिक इमारतींसारख्या महत्त्वपूर्ण इमारतींसह हा एक व्यावसायिक क्षेत्र आहे. स्वारगेट हे पुणे मेट्रो प्रकल्पातील प्रमुख प्रमुख म्हणूनही काम करतील. हे पीएमपीएमएल बसने शहर व आसपासच्या खेड्यांशी चांगले जोडलेले आहे. स्वारगेटचा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा समृद्ध इतिहास आहे. स्वारगेट येथून पहिली बससेवा १९४० मध्ये सुरू करण्यात आली. त्यावेळी, टोंगावाला किंवा घोडागाडी मालकांनी या निर्णयाला विरोध केला. १९४१ मध्ये स्वारगेटमधून पहिली सार्वजनिक बस निघाली.

स्वारगेट हे महाराष्ट्र राज्य परिवहन नेटवर्कचे एक प्रमुख केंद्र आहे. येथून बसेस मुंबई, सातारा, बारामती, कोल्हापूर, बेळगाव व पुण्याच्या आसपासच्या इतर ठिकाणी रवाना होतात. पहाटे 4 ते मध्यरात्री पर्यंत बसेस चालतात. अलीकडेच या भागात प्रचंड वाहतुकीमुळे पुणे महानगरपालिका सरकारने या भागातील प्रमुख रस्ते केवळ एकतर्फी करण्याचा निर्णय घेतला आहे. ती खूप गर्दीची जागा आहे.


Leave a Comment