Health tips in Marathi: आजकालच्या या आधुनिक युगात हवामान हे झपाट्याने बदलत आहे. कधी खूप पाऊस असतो तर कधी ऊन या झपाट्याने होणाऱ्या बदला मुळे त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो. आपण उन्हाळ्यात थंड पाणी पीतो आणि पावसाळ्यात आईस्क्रीम खातो त्यामुळे घशात सूज येणे व घसा दुखणे अशा समस्या अधिक वाढतात.
काही लोकांसाठी हा त्रास इतका वाढतो की त्यामुळे तापही येतो. सर्दी-खोकला पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात सर्वाधिक असतो, त्याचा परिणाम आपल्या घशावर होतो. कधीकधी घशात ऍलर्जी देखील होते, त्यामुळे काही खाताना पिताना त्रास होतो . तुम्हालाही अशी समस्या जास्त असेल तर आपण घरगुती उपायांचा अवलंब करू शकतो. यामुळे घसा खवखवणे आणि संसर्गापासून आराम मिळेल.
उपाय :-
१) रात्री झोपण्यापूर्वी पाच – सहा कली मिरी आणि तेवढेच बत्ताशे चाऊन खा. जर बत्ताशे नसतील तर खडी साखर चालेल. हे चावताना रस गिळत राहिल्यास घसा खुलतो.
२) घशा मध्ये सूज आली असेल आणि कफ जास्त निघत असल्यास दोन ग्राम ओवा चाऊन खा. व त्यावर गरम पाणी प्या. ह्या मुळे सूज मिटून आराम पडेल.
३)घसा दुखत व खवखवत असल्यास रात्री हळदीचे दूध प्यावे. हळदीमध्ये अँटीबायोटिक घटक असतात जे खवखव आणि वेदना कमी करतात. हळद ही घशासाठी फायदेशीर आहे.
४) लसणाचा रस काढून त्या मध्ये हिंग मिसळून घशा बाहेरून लावल्यास आराम पडतो. व घशा ची सूज देखील कमी होते.
५)घसा दुखत किंवा कोणत्याही प्रकारचे घशामध्ये इन्फेक्शन असल्यास मधाचे सेवन करावे. मधामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात जे घसादुखी, खोकला या पासून आराम देतात.
टीप : वरील सर्व बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून इन मराठी.इन कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.