Ukadiche Modak In Marathi/उकडीचे मोदक रेसीपी

Ukadiche Modak बनवण्याची उत्तम व सोपी रेसीपी :

” नमस्कार inMarathi मध्ये तुमचे स्वागत आहे . आज तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये झटपट स्वादिष्ट मोदक कसे करायचे याची संपूर्ण रेसीपी दिली आहे.मला आशा आहे कि हि रेसीपी तुम्हाला नक्की आवडेल.

उकडीचे मोदक, हे विशेषतः श्री गणेश चतुर्थीच्या उत्सवात तयार केले जातात.आणि असे मानले जाते की उकडीचे मोदक हा श्री गणेशा चा आवडता गोड पदार्थ आहे; म्हणूनच या सणाच्या वेळी नैवेद्य म्हणून दिले जातात.

तर झटपट उकडीचे मोदक कसे तयार करायचे याची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे ज्या मुळे तुमचे उकडीचे मोदक उत्तम होतील. आणि या सर्व रेसिपी साठी फक्त तुम्हाला ३० मिनिटे लागतील.

Ukdiche Modak Recipe चे साहित्य आणि कृती खालील प्रमाणे:-

Ukadiche Modak साहित्य :-

१) २ कप किसलेले ओले खोबरे .

२) १ कप गुळ.(चिरलेला)

३) १ कप तांदुळाचे पीठ.

६)१ चमच वेलची पावडर.

४) १ कप पाणी.

५) २ चमचे तेल.

७) १/४ मीठ ( चवीनुसार ).

Ukadiche Modak बनवण्याची कृती:-

१) सारण कृती :

१.सर्वप्रथम कढई मध्ये किसलेला नारळ व चिरलेला गुळ टाकून मध्य आचेवर मिसळत रहा.

२.गुळ वितळल्यानंतर त्या मध्ये वेलची पावडर घाला, आणि मिश्रण मिसळा. आता तुमचे सारण तयार आहे त्याला भांड्या मध्ये काढून थंड करा .  

२) उकडीची कृती :

१. मोठ्या आचेवर गॅस वरती कढई मध्ये पाणी घालून गरम करा; त्या नंतर त्यात मीठ, २ चमचे तेल घालुन उकडून घ्या.

२. आता गॅस मध्य आचेवर करा १ कप तांदुळाचे पीठ घाला आणि झाकण ठेवून १० मिनिट पर्यंत शिजवून घ्या.

३. पीठ शिजल्यानंतर नीट मिसळून घ्या व भांडया मध्ये काडा, मग हाताला तेल आणि पाणी लावून पिठील मउ होई पर्यंत मळून घ्यावे.

३) मोदक ची कृती :

१. आता पिठाचा लहान गोळा करून मोदकाचे साचाच्या सर्व बाजूनी पाकळी भरून त्यात सारण घालून साचाच्या पूर्णपणे पीठ लाऊन बंद करून घ्या,मग साचा उघडा मोदक तयार होईल.

२. आता उकडी साठी एक प्लेट मध्ये तेल लाऊन त्यावरती सर्व मोदक ठेवा, इडलीचा कुकरात किवां कुठलाही भांड्या मध्ये १/५ कप पाणी टाकून मोदकाची प्लेट त्या मध्ये ठेवून १० मिनिटांसाठी त्यावरती झाकण ठेवून उकड्यासाठी ठेवून द्या, मग त्यानंतर तैयार आहे तुमचे उत्तम व स्वादिष्ट “ Ukdiche Modak .

तर नक्की करुन पहा आणि जर तुम्हाला Ukadiche Modak Recipe आवडली असेल तर नक्की कमेंट करा. अशाच मोदकाच्या व इतर नवनवीन पाककला तुमच्या जवळ असतील असतील तर आम्हाला कळवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी InMarathi.in ला नक्की भेट घ्या .

Leave a Comment