नवरदेवासाठी उखाणे | ukhane in marathi for male | मराठी उखाणे

मराठी उखाण्यांचा संग्रह फक्त तुमच्या साठी | ukhane in marathi for male in marathi. | मराठी उखाणे

Read More : मराठी उखाणे

Read More : funny marathi ukhane

प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल
— — — च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल


आकाशाच्या पोटात चंद्र, सूर्य, तारांगणे — — — च नाव घेतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे


एक होती चिऊ आणि एक होता काऊ
— — — च नाव घेतो, डोकं नका खाऊ


माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप
— — — ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप


प्रेमाच्या चौकात किती पण फिरा
शोधून नाही सापडणार — — — सारखा हिरा


Read More : प्रेमावरच्या कविता वाचण्यासाठी यावर क्लिक करा 👈


गोऱ्या गोऱ्या गालावरती तीळ काळा काळा
— — — च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा


नवे घर, नवे लोक, नवी नवी नाती..
संसार होईल मस्त, — — — राव असता सोबती


“आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद ,
— — — चे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद!”


— — — रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन
आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन


अंतरिचे गीत उमटले,शतजन्मीचे नाते जुळले,
— — — सह अंतरी प्रितीचे फुल फुलले (उमलले).


अजिंठा-वेरुळ्ची जगप्रसिद्ध आहे कोरीव लेणी,
— — — नी आणलीये सुगंधी वेणी.


आंनदाने भरला दिन हा लग्नाचा
— — — रावांना घास देते गोड जिलेबीचा.


आई वडील सोडताना, पाउल होतात कष्टी
— — — रावांच्या संसारात करीन मे सुखाची सृष्टी


Read More : प्रेमावरती सुंदर शायरी वाचण्यासाठी यावर क्लिक करा 👈


आई, बाबा येते आशीर्वाद दयावा
— — — रावांचा सहवास जन्मभर लाभावा.


आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस
— — — राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस


आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा
— — — राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा


आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी,
— — — ना घास भरवतो त्यातलीच चव थोडी.


आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर
आयुष्याचा प्रवास करीन — — — रावांच्या बरोबर.


कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगन्ध,
— — — च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद


कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार…
— — — रावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार!!!


उन्हाळ्या चे दिवस आले झाली लग्ने सुरु — — — रावांचे नाव घेऊन केला आमचा संसार सुरु..!


आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद
— — — चे नाव घेते तुम्हा सर्वाचा आशिर्वाद


आशीवार्दाची फुले वेचते वाकून — — — चे नाव घेते तुमचा मान राखून


आम्र व्रीक्ष मोहर्ल्याने लागते घ्रीश्माची चाहूल
— — — रावांच नाव घेवून टाकते पुढच पाऊल


Leave a Comment