बाळंतपणात महिलांनी कोणती काळजी घ्यावी सविस्तर वाचा..

What care should women take during pregnancy: बाळंतपणात महिलेने स्वतःची तसेच होणाऱ्या बाळाची काळजी घेणे खूप गरजेचे असते. चला तर जाणून घेऊया कशाप्रकारे घेतली पाहिजे.

गर्भधारणेदरम्यान काय करावे, काय करू नये :

1) गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करवण्याच्या काळात अधिक अन्न घ्यावे.

2) एक अतिरीक्त जेवण चालू शकेल.

3) संपूर्ण धान्य, मोडवलेलं कडधान्य आणि आंबवलेले पदार्थ खावेत.

4) दूध, मांस, अंडे यांचे सेवन करावे.

5) भरपूर पालेभाज्या आणि फळे खावीत.

6) मद्य किंवा तंबाकू यांचे सेवन करु नये.

7) लिहून दिली असतील तेव्हाच औषधे घ्यावीत.

8) गर्भधारणेच्या 14-16 व्या आठवड्यानंतर नियमितपणे लोह, फोलेट आणि कॅल्शिअमचा पूरक डोस घ्यावा आणि स्तनपान करवण्यादरम्यान तो चालू ठेवावा.

9) चहा आणि कॉफी यांसारखी पेये आहारातील लोहाला बांधून ठेवतात आणि उपलब्ध होऊ देत नाहीत, त्यामुळं ती
आहारापूर्वी आणि नंतर लगेच घेऊ नयेत. गर्भवती महिलांना चालणे आणि अन्य शारीरिक कामं आवश्यक आहेत आणि त्यांनी अति शारीरिक काम, विशेषतः गर्भधारणेच्या अंतिम महिन्यात टाळावे.

What care should women take during pregnancy tips.

आईला भरपूर दुध येत नसल्यास काय करावे:

1) आईने पोटभर जेवण करावे तसेच तसेच फावल्या वेळेत ड्रायफ्रूट्स चे सेवन करावे.

2) पहिले अन्न व पाणी घेऊन तिने बाळाला आपले स्तन चोखावयास देणे. असे केल्यास कित्येक वेळा दुध पुन्हा चालू होते.

3) आईचे दूध वाढण्यासाठी आहारात दूध व तूप, लोणी, पनीर इत्यादी दुधाचे पदार्थ असावेत.

4) तेवढे करून दुध पूर्ण बंद झाले असेल, तर बाळाला बाहेरचे दुध चालु ठेवावे. यात गाय किंवा बकरीचे दुध सर्वात उत्तम.

5) बाटलीने दुध पाजणे हे बाळाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. बरेच वेळा अस्वच्छते मुळे उलटया, जुलाब होऊन बाळाच्या शरीरातील पाणी कमी होते.

6) बाळासाठी दुध विकत घेणे परवडत नसेल तर तांदूळ, नाचणी, मका, पोहे इ. मध्ये वेगवेगळ्या डाळी व तूप घालून
शिजवून भरडीसारखी करून पाजावे.

7) बाळाला नुसती भाताची पेज देवून उपयोग नाही तर त्याबरोबर दाल व इतर कडधान्यासारखा जास्त प्रथिनयुक्त आहार दयावा. नुसत्या भातावर वाढलेली मुले अशक्त राहण्याचा संभव असतो.

Leave a Comment